सांगली सिटीलाईन न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील कडेगाव येथील शासकीय विश्रामगृहात काल "चल हल्ला बोल" चित्रपट सेन्सर बोर्ड मान्यतेसाठी शिव ,फुले ,शाहू, आंबेडकर चळवळीच्या वतीने आंदोलनातून संघर्ष उभा करण्यासाठी चर्चा बैठक पार पडली.
बैठकीत सुरवातीला सर्वांची ओळख करून घेण्यात आली. त्यानंतर चित्रपट दिग्दर्शक, लेखक, निर्माते महेश बनसोडे यांनी लोकांचा सिनेमा चळवळ का सुरु झाली? भविष्यात या चळवळीचे महत्व काय? प्रस्तापित फिल्म इंडस्ट्रीजला पॅरलल फिल्म इंडस्ट्री कशी सुरु करायची सेन्सॉर बोर्ड बहुजनांच्या फिल्म का सेन्सॉर होऊ देत नाही?
सेन्सॉर बोर्डावर ब्राम्हण्यवादी साडेतीन टक्के वाल्यांचा कब्जा आहे. बहुजनांच्या टॅक्सच्या पैशातून गले लट्ट मानधन घेऊन हे ब्राम्हन्यवादी साडेतीन टक्के लोक आपल्या बहुजनांच्या फिल्म मार्केट मध्ये येऊ देत नाहीत. सिनेमागृह मिळू देत नाहीत.बहुजनांच्या कथा,व्यथा सिनेमाच्या माध्यमातून पडद्यावर येऊ नये यासाठी सेन्सॉर बोर्डाचा वापर केला जात आहे.
बहुजनांची भाषा समजून न घेणारे सेन्सॉर बोर्ड काय कामाचे? या देशाला सेन्सॉर बोर्डाची गरज आहे का? या विषयावर चर्चा केली."चल हल्ला बोल "सिनेमाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालेच पाहिजे अन्यथा सांगली जिल्ह्यात मोठे आंदोलन सुरु करू तसेच लोकांचा सिनेमा चळवळ जिल्ह्यात जोमाने सुरु करू असे सर्व पक्षीय, संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत निर्णय घेतला.
या बैठकीस सर्व चळवळीतिल सर्व मान्यवर उपस्थित होते.या बैठकीसाठी "चल हल्ला बोल "चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक व निर्माते महेश बनसोडे कडेगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष परशुराम माळी , जनता क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष आकाश सातपुते बहुजन समाज पार्टीचे.
शिवलिंग सोनवणे बामसेफ प्रचारक तानाजी तुपे, रिपाईचे सांगली जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ माने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे रिपाइंचे कडेगांव तालुकाध्यक्ष जितेंद्र सोरटे डी.पी.आय जिल्हाध्यक्ष आकाश वाघमारे, रिपाइंचे संघटक हनुमंत मंडले रिपाईचे युवक तालुकाध्यक्ष.रुपेश कांबळे निखिल वायदंडे, सुरज कमाने आदी उपस्थितीत होते.
