अहमदनगर नितीनचंद्र भालेराव जगात फार कमी शहरे अशी आहे ज्यांचा स्थापना दिवस माहिती आहे, त्यापैकी एक अहमदनगर शहर.संस्थापक अहमद निजाम शहा यांनी २८ मे १४९० रोजी वसविले.
येणाऱ्या २८ मे रोजी अहमदनगर शहराचा ५३५ वा स्थापनादिवस आहे. त्यानिमित्त मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, रहेमत सुलतान फाउंडेशन व अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने २४ ते ३१ मे २०२५ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी सांगितले.
या सप्ताहामध्ये शनिवारी ता.२४ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजता महफिले मुशायरा, २५ व २६ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ऐतिहासिक जुन्या नोटा, स्टॅम्प, पोस्ट पाकीट तसेच शिवरायांचे गडकिल्ल्यांचे फोटो प्रदर्शनाचे आयोजन सर्जेपुरा येथील रहमत सुलतान सभागृहात करण्यात आले आहे.
तर २७ मे २०२५ रोजी अल करम हॉस्पिटल, किंग्सगेटरोड, रामचंद्र खुंट येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत डोळे तपासणी, सर्व रोगनिदान, तपासणी व उपचार आदी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तर बुधवारी २८ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता बागरोज हडको येथे अहमदनगर शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर चादर अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तर २९ व ३० मे २०२५ रोजी अहमदनगर शहरातील निजामशाही काळातील, शिवकालीन व ब्रिटिशकालीन इमारतींचे फोटो स्पर्धा असेल व ३१ मे २०२५ रोजी गीत, गझल, कव्वालीच्या कार्यक्रमाने सर्जेपुरा येथील रहमत सुलतान सभागृहात संध्याकाळी ७ वाजता सप्ताहाचा समारोप होईल, असे रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर यांनी सांगितले.
तरी या सर्व कार्यक्रमात इतिहासप्रेमी व रसिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाचे अभिजीत वाघ व भैरवनाथ वाकळे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी ९८६०४७७८६९ वर संपर्क साधावा असे आव्हान यावेळी करण्यात आले.
