अवकाळी पावसाने शेतकरी चिंताग्रस्त
नाशिक दिनकर गायकवाड इगतपुरी तालुक्यात बेमोसमी म्हणजेच अवकाळी पावसाने थैमान घातल्याने बागायती पिके टमाटे,काकडी, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी व इतर भाजीपाला त्याचाप्रमाणे कांदा पिक शेतात असल्याने अवकाळीने देखील या पिकांचे नुकसान केले असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस जागोजागी पड़त असल्याने मोठ्या प्रमाणात वातावरणात उष्णता निर्माण झाली होती.त्यामुळे अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे. अगोदरच यावर्षी बागायती पिकांना भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे.