-जाणिवा प्रगल्भ असलेल्या वडिलांनी मिळविले ५१ टक्के;मुलांनी भरविले पेढे
-माणूस अजन्म विद्यार्थी याचा आला अनुभव
आश्वी खुर्द संजय गायकवाड महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीची परीक्षा खासगीरीत्या देण्यासाठी ‘फॉर्म नंबर १७’ भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील एक्केचाळीस वर्षीय युवक यांने १७ नंबर फॉर्म भरुन दहावीची परिक्षा दिली अन् पहिल्याच प्रयत्नात संतोष भडकवाड इयत्ता दहावी परिक्षा उत्तीर्ण झाले आणि आणखी पुढे शिकण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली या आश्चर्यकारक धक्क्याने संतोष भडकवाड यांचा परिवार मित्र आतेष्ठ आणि गावकऱ्यांना आनंद वाटला आहे.
स्वप्नांना वयाचं बंधन नसतं हे आपण कित्येक वेळा ऐकतो. पण एका ठराविक वयानंतर आपल्या तोंडून आपसूकच शब्द येतात 'आता काय वय राहिलं का?'काही गोष्टी करायचं वय निघून गेलं म्हणून अनेक जण आपल्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करताना दिसतात पण खरं तर आपण आपली स्वप्नं कोणत्याही वयात पूर्ण करू शकतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आश्वी खुर्द येथील संतोष भडकवाड याचं त्यांच्या परिक्षा निकालाने आश्वी पंचक्रोशीत चर्चा होतांना दिसते
१० वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला.निकाल लागल्यानंतर मुलांना पेढे भरवत असलेले पालक तुम्ही पाहिले असतीलच.पण ना! अभ्यास ना! पुर्व तयारी फक्त मित्र म्हणाले दहावीची परिक्षा १७ नंबर फॉर्म भरून द्या अन् फॉर्म भरला प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय अशी खुर्द येथुन आणि पहिल्याच प्रयत्नात इच्छाशक्तीच्या जोरावर शेकडा ५०.४० टक्के गुण घेत पास झाल्याचा आनंद मुलगा ओम व मुलगी अंकिताच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता व मुले वडीलांना पेढे भरवत होते यावेळी हे चित्र एखाद्या सिनेमात शोभावं असे दिसत होते.
आश्वी खुर्द येथील मा.ग्रामपंचायत सदस्य तथा पुंजाआई फाउंडेशनचे संचालक संतोष भडकवाड यांना मित्रांनी सल्ला दिला होता तुम्ही यंदा १७ नंबर फॉर्म भरुन दहावीची परीक्षा द्या! अन् योग्य वेळी फॉर्म भरला मात्र पुस्तक नाही कि कोणत्याही शिक्षकाचे मार्गदर्शन नाही ना कसला अभ्यास परिक्षा सुरु झाली आणि सर्व पेपर देत गेले निकाल जवळ आला मात्र काय?होईल हे मात्र माहीत नाही नुकताच ऑनलाईन निकाल घेतला अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला फक्त पास नाही तर चक्क पहिल्याच प्रयन्तात त्यांनी ५०.४० टक्के गुण मिळविलले परिस्थिती हालाखीची असल्याने शाळा अचानक सोडावा लागली व शाळा शिकण्याची इच्छा मनातच राहीली मात्र मित्रांच्या प्रेमापोटी बाहेरून १७ नंबर फॉर्म भरून चक्क पहिल्याच प्रयन्तात यश मिळाले मराठी विषयात ५४ हिंदीला ५५ इंग्लिशला ३५ गणीत ३५ विज्ञान ५० समाज शास्रास ५८ गुण असे शेकडा ५०.४० टक्के गुण मिळाले
त्यांच्या या यशाबद्दल युवानेते मा.खा.सुजय विखे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड .अनिल भोसले सरपंच सौ.अलका गायकवाड उपसरपंच बाबा भवर ना. राधाकृष्ण विखे पा.यांचे स्विय सहाय्यक बापुसाहेब गायकवाड ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे मा.उपसरपंच संजय गायकवाड ग्रा.प.सदस्य सोपान सोनवणे संजय भोसले सागर भडकवाड दुध संस्थेचे अध्यक्ष मकरंद गुणे तंटामुक्ती अध्यक्ष कैलास गायकवाड बाबासाहेब भोसले मोहीत गायकवाड मनोज कहार शरद सोनवणे विकास गायकवाड ह. भ.प.सुनिल पवार सचिन गायकवाड आदिंनी अभिनंदन केले