मुंबई दिपक कदम ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी त्यांच्या प्रत्येक नेहमी खंबीरपणे साथ देणारे मुस्लिम ओबीसी समाजाचे नेते आणि आपल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस शब्बीर अन्सारी यांचे कर्करोगाचे निदान झाले असून ते सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची नुकतीच भेट घेऊन अन्सारी यांना सदिच्छा दिल्या.
याबद्दलची माहिती कळताच ओबीसी समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्या कुटुंबियांशी आणि रुग्णालयातील डॉक्टरांशी देखील अन्सारी यांच्या प्रकृतीबाबत चर्चा केली. आपल्या आंदोलनात आपल्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या या ज्येष्ठ नेत्याला अशा गंभीर आजाराने गाठणे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. परंतु त्यांचा लढवय्या स्वभाव व दुर्दम्य इच्छाशक्ती यांच्या बळावर ते नक्कीच यातून लवकर बरे होतील, अशी आशावाद भुजबळ यांनी व्यक्त केला.
याबद्दल अन्सारी यानां देखील आधार व आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला, तसेच या कठीण काळात संपूर्ण समता परिषदेचा परिवार आपल्यासोबत असल्याचा विश्वास यावेळी दिला.मंत्री छगन भुजबळ यांनी दिला
