नाशिक दिनकर गायकवाड- एकाच सोसायटीतील तीन फ्लॅट्सचे कुलूप व कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याचा प्रकार पंचवटीत घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी आदित्य दीपक पाटील (रा. दुगाव, ता. चांदवड) हे पंचवटीतील साईकलश अपार्टमेंट येथे राहतात.अज्ञात चोरट्याने पाटील यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून त्याद्वारे घरात प्रवेश केला.पाटील यांच्या घरातील १ लाख रुपये रोख, तसेच सोसायटीतील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या प्रांजली सुधाकर शेवाळे यांच्याही घराचे कुलूप कशाच्या तरी
सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटात असलेले सुमारे दोन तोळे वजनाचे ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व १५ हजार रुपयांची रोकड,तसेच याच सोसायटीत राहणारे प्रवीण मधुकर शेजवळ यांच्याही फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील पाच हजार रुपये रोख व २५ हजार रुपये किमतीचे लहान मुलाचे गळ्यातील ओमपान व इतर दागिने चोरून नेले.या तीनही घरफोड्यांमध्ये एकूण २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.