श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर शहराच्या वार्ड क्रं. १ ,भाग क्रं ४ या बोरावके भागात नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या विकास कामांच्या निधीतून नुकतेच रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पार पडला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ अभियंता के.के.आव्हाड होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष श्री.नितीन
दिनकर, नगरपरिषदेच्या मा. नगराध्यक्षा अनुराधा आदिक, जेष्ठ उद्योजक आशिष बोरावके, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, शिल्पा आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मानाचा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा नामदार राधाकृष्ण विखे पा. मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज नवले पाटील यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.अनिल बागुल यांनी दिला. तसेच उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक मंडळाचे अध्यक्ष मनोज नवले पाटील यांनी केले.
या प्रसंगी जेष्ठ अभियंता के.के.आव्हाड, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा. नगराध्यक्षा अनुराधा आदिक, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड या मान्यवरांच्या हस्ते रस्ता विकास कामाचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी नामदार विखे यांच्या विविध विकास निधीतून झालेल्या कामांची माहिती दिली. पालकमंत्र्यांनी केलेल्या विकास कामाबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हा रस्ता फेमस बाजार बोरावके नगर ते महानुभाव आश्रम पर्यंत असून यासाठी १ कोटी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता मिळणार आहे. यावेळी श्रीमती मंगला दुशिंग, श्रध्दा आव्हाड, अरुण साळे काका ,संजय दुशिंग ,आदिक श्री.दोशी ,बंडु शिंदे ,डॉ. विजय त्रिभुवन, मनोज विश्वासे, ॲड. आदर्श दुशिंग, प्रमोद पतकी, सुरेश कांबळे , कचेश्वर जठार , दिलीप सगळगिळे , आदित्य आदिक, प्रा.अनिल बागुल , लेविन भोसले ,दिपक कदम तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .या विकास कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तर उपस्थितांचे आभार लेविन भोसले यांनी मानले.
