सांगली सिटीलाईन न्यूज नेटवर्क नुकतेच सांगली येथील पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
या उद्घाटन सोहळ्यास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री सुरेश खाडे, आमदार मा. अरुण अण्णा लाड तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही नवी प्रशासकीय इमारत हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या इमारतीमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होईल आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील.सांगली जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या सशक्ती करणासाठी सांगली पोलिसांना याचा फायदा होईल असा विश्वास आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला
