जात प्रमाणपत्र मिळेल ऑनलाईन,बार्टीच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारचा हिरवा कंदील

Cityline Media
0
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क-जातवैधता प्रमाणपत्र हे लवकरच एका क्लिकवर ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि टीसीएसच्या वतीने ही ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.या प्रमाणपत्रात समाविष्ट केलेल्या छायाचित्रामुळे गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे.
राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील नागरिकांना सरकारी नोकरी,शैक्षणिक, निवडणूक आणि सरकारच्या मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेल्या अन्य कोणत्याही कामकाजासाठी मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र,जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

जात प्रमाणपत्र,जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेदरम्यान अर्जदारांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास अडचणी येतात.त्यामुळे जातप्रमाणपत्र,जातवैधता प्रमाणपत्र वेळेत मिळण्यास विलंब होतो.त्यामुळे अर्जदारांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो.

 या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात संगणकीय ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित आधार क्रमांकासह एकत्रीकरण असणार आहे. यात नाव, वडील किंवा पतीचे नाव, आधारमध्ये नमूद केलेले मूळ स्थान यासारख्या मूलभूत माहितीची तपासणी होईल आणि कागदपत्रांच्या 'पडताळणीसाठी डीजी लॉकर या ॲपचे एकत्रीकरण (इंटिग्रेशन) असणार आहे.

-प्रणाली विकसित करण्यासाठी 'टीसीएस'ला २५ कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात येणार आहे.याबाबत टीसीएसने सादर केलेला प्रस्ताव बार्टीने सरकारकडे पाठवला, त्याला शासनाने मान्यता दिली आहे.

अशी असेल प्रणाली नागरिकांना प्रत्यक्ष तपासणीसाठी ऑनलाइन पद्धतीने पसंतीचे स्लॉट निवडण्याची सुविधा.
टोकनद्वारे ठरावीक दिवस व वेळेची स्लॉटसह व्यवस्था.
प्रमाणपत्रात एक एम्बेड केलेले छायाचित्र असेल, यामुळे गैरवापराला चाप बसेल.

नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी दरम्यान छायाचित्र घेण्याची सुविधा आणि घेतलेले छायाचित्र नागरिकांच्या अर्जासोबत अपलोड केलेल्या छायाचित्राशी जुळविले जाईल.आधार आणि डीजी लॉकरद्वारे विनंतीची पडताळणी करण्याची सुविधा.

प्रणालीत मोबाइल आधारित सेवा उपलब्ध आणि व्हॉट्सॲप आधारित सेवा सक्रिय करता येणार.

जात प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती मिळविण्यासाठी संबंधित विभागांसोबत ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीएआय) एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!