नाशिक दिनकर गायकवाड- बुद्ध पौर्णिमेच्या निमिताने द्वारका परिसरातील पी.डी. गांगुर्डे सोशल ग्रुपच्या वतीने भंन्ते महेश पगारे यांच्या हस्ते वैशाख पौर्णिमा परित्राण पाठ सूम्पठण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास काठे गल्ली,द्वारका परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी खिरदान प्रसाद वाटप करण्यात आले.
मा.महापौर अशोक दिवे, मा.आमदार वसंत गिते, श्रीपाद कुलकर्णी,पी.के गायकवाड, एस.एन.शिंदे, पी.डी. काळे, दिनकर दाणी व शशिकांत उपासनी या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
समारंभास मनोज गोडसे, रामेश साळवे, मिलिंद भालेराव, चंद्रकांत थोरात धनंजय बतुर, संजय मंडलिक, जयराम वाघ, भालचंद्र जाधव, संदीप डोळा, परिसरातील भारती शेलार,सुरेखा वाघ, लता वाघ, भारती पाटील,अनिता खवणे, वंदना गुंजाळ, मनीषा जाधव आदींसह अनेक नागरिकांनी खिरदानाचा लाभ घेतला.
संस्थेच्या वतीने आणि गांगुडे परिवार यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष राजेश गांगुर्डे, संदीप गांगुळे, दीपक कटाने व दत्ता गांगुळे यांनी पाहुण्याचे स्वागत केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रसाद नागवंशी, संजय खरे,सुशील बरें,राजेश शेळके,विजय अहिरे आदींनी परिश्रम घेतले.