चर्चच्या इतिहासातील पहिले अमेरिकी धर्मगुरु रॉबर्ट प्रीवोस्ट नवे पोप

Cityline Media
0
व्हॅटिकन सिटी सिटीलाईन मिडिया नेटवर्क 
सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून गुरुवारी अखेर पांढरा धूर बाहेर पडला आणि कॅथलिक चर्चच्या नवीन धार्मिक नेत्याची निवड झाल्याचे संकेत मिळाले. १३३ कार्डिनलच्या मतदानातून २६७वे पोप म्हणून रॉबर्ट प्रीवोस्ट यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. चर्चच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासातील पहिले अमेरिकी पोप ठरले आहेत. प्रीवोस्ट यांच्या नावाची घोषणा होताच सेंट पीटर चौकात जमलेल्या नागरिकांनी या वेळी एकच जल्लोष केला.
पोप फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी झालेल्या परिषदेत ६९ वर्षीय रॉबर्ट प्रीवोस्ट यांना आवश्यक दोन तृतीयांश किंवा किमान ८९ मते मिळाली. प्रीवोस्ट यांनी धर्मप्रचारक म्हणून पेरूमध्ये सेवा देण्यात आपली कारकीर्द घालवली; तसेच व्हॅटिकनच्या शक्तिशाली रॉबर्ट प्रीवोस्ट बिशप कार्यालयाचेही त्यांनी नेतृत्व केले आहे.

पोप निवडीसाठी बुधवारी सायंकाळी मतदानाची पहिली फेरी पार पडली. यात निवड होऊ न शकल्याने रात्री पुन्हा मतदान झाले; परंतु यातूनही नव्या पोपची निवड झाली नाही. त्यामुळे कार्डिनल गुरुवारी सकाळी पुन्हा सिस्टिन चॅपलमध्ये आले. इथे तिसऱ्यांदा मतदान झाल्यानंतर सकाळी ११.५० वाजता (स्थानिक वेळेनुसार) चिमणीतून काळा धूर येऊ लागला. अर्थात, मतदानाच्या तिसऱ्या फेरीतही पोपची निवड झाली नसल्याचे याद्वारे स्पष्ट झाले.

नवीन पोप निवडीसाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत किंवा ८९ मते कोणालाही न मिळाल्याने १३३ कार्डिनल त्यांच्या व्हॅटिकन निवासस्थानात परतले. तिथे त्यांना एकांतात ठेवण्यात आले आहे. हे सर्व जण दुपारचे जेवण झाल्यानंतर मतदानासाठी पुन्हा सिस्टिन चॅपलमध्ये आले. या दिवसभरात मतदानाची आणखी दोन मतदान सत्रे झाली.दरम्यान, 'काही तासांत नवीन पोपची निवड होईल,' अशी आशा वरिष्ठ कार्डिनल जियोव्हानी बॅटिस्टा रे यांनी व्यक्त केल्याचे इटलीच्या एका आघाडीच्या वृत्तपत्राने म्हटले होते.

'आज संध्याकाळी रोमला परतल्यावर (सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून) पांढरा धूर निघताना दिसेल अशी मला आशा आहे,' असे ते म्हणाले होते. जिओव्हानी ९१ वर्षांचे असून, पुढील पोपची निवड करणाऱ्या १३३ कार्डिनलच्या बैठकीत सहभागी होणारे ते सर्वांत वयस्कर कार्डिनल आहेत. बुधवारी कार्डिनलची बैठक सुरू होण्यापूर्वी जियोव्हानी यांनी प्रार्थना सभा आयोजित केली होती.दरम्यान, हजारो लोक सेंट पीटर्स स्क्वेअरबाहेर जमले होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!