नगर मनमाड मार्गावरील तिसगाव फाटा येथे भीषण अपघात

Cityline Media
0
कोल्हार दिपक कदम राहता तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावरील कोल्हार परिसराच्या तिसगाव फाटा येथे आयाशरचा भीषण अपघात घडल्याची घटना नुकतीच घडली.
उत्तरप्रदेश मधील समसाबाद ,तालुका- फत्याबाद, येथील शेतकरी विक्रसिंह हे स्वतः आपल्या शेतात पिकविलेला बटाटा घेऊन ट्रक क्रमांक आर जे ११जी ही ३९९६  यामध्ये अहिल्यानगर  या ठिकाणी जात असताना नगर- मनमाड महामार्गावर तिसगाव फाटा या ठिकाणी पहाटे पाच वाजता हा भीषण अपघात घडला.

शिर्डी कडून अहिल्यानगरचे दिशेने जात असताना तिसगाव फाटा या ठिकाणी स्पीड ब्रेकरवरून एक कंटेनर जात असतानाही ! हा ट्रक मागून भरघाव वेगाने येऊन कंटेनरवर जाऊन आदळला.या घटनेत ड्रायव्हरच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्याला प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे उपचारासाठी नेण्यात आले.

पहाटेच्या सुमारास घटना घडल्या नंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.त्यामुळे अडथळा निर्माण झाला होता काही काळानंतर वाहतूक सुरळीत झाली लोणी पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला घेत बाकी वाहनांना रस्ता मोकळा करून दिला .यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!