नाशिक दिनकर गायकवाड- घरातील कुटुंबीय लग्नासाठी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून १४ तोळे दागिन्यांसह रोकड असा एकूण साडेसात लाख रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरुन नेल्याची घटना पखाल रोड येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अंजुम बिस्मिल्ला कुरेशी (रा. गुलशन कोलनी, फ्खाल रोड, नाशिक) यांचा भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. कुरेशी हे दि. २४ ते २६ मे दरम्यान पत्नी व कुटुबियांसह छत्रपती संभाजीनगर येथील नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले होते. ही संधी
साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप व कडीकोयंडा काशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला, बेडरूममधील कपाटात व बॅगांमध्ये ठेवलेले १ लाख २२ हजार रुपयांचा ३६ ग्रॅम सोन्याचा नेकलेस, ७० हजार रुपये किमतीची २० ग्रॅमची सोन्याची चेन, २८ हजार रुपये किमतीची ८ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १४ हजार रुपये किमतीधी ४ ग्रॅमची सोन्याची लेडीज अंगठी, सात हजार रुपयांची दोन ग्रॅमची लेडीज अंगठी, १४ हजार रुपये विमतीची घार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ८५ ग्रॅम वजनाची चांदीची चेन, १४ हजार रुपये किमतीचे २५० ग्रॅम चांदीचे पायल व जोडवे, १७
हजार ५०० रुपयांची पाच ग्रॅम लेडीज अंगठी, ३५ हजार रुपयांची १० ग्रॅमची लेडीज पोत, ३१ हजार ५०० रुपये किंमतीच्या नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३१ हजार ५०० रुपयांची साडेनऊ ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी, १ लाख १९ हजार रुपये किमतीची ३४ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, १४ हजार रुपये किमतीची चार ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३० हजार रुपये किमतीचा आयफोन व दोन लाखांची रोकड असा एकूण ७ लाख ५२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून बोल्न नेला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.