राहुरी प्नतिनिधी राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात नगर मनमाड राज्य महमार्गावर फ्रिज व वातानुकूलित यंत्र यांचे पार्ट्स घेऊन मनमाडकडे जात असलेल्या भरधाव कंटेनरचा अचानक टायर फुटला.अनियंत्रित झालेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला खोदून ठेवलेल्या खड्ड्यात गेल्याची घटना नुकतीच पहाटेच्या सुमारास घडली.
अपघात होताच काही क्षणातच यानंतर गाडीला अचानक आग लागली! डिझेल टाकी फुटल्याने आगीचा भडका उडाला आणि कंटेनरने पेट घेतला.यामध्ये चालक-वाहकाला गंभीर इजा झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी राहुरी येथे हॉस्पीटल मध्ये पाठवण्यात आले.
कंटेनरमधील लाखो रुपयांचे फ्रिज वातानुकूलित यंत्र आणि गोदरेज कंपनीच्या पार्ट्सची देखील जळून राख झाली असून हा अपघात नगर मनमाड महामार्गवरील गुहा येथील पेट्रोल पंपासमोर पहाटेच्या सुमारास घडला. यावेळी सकाळपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.आग लागल्यानंतर राहुरी नगरपरिषद तसेच देवळाली प्रवरा नगरपरिषद येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. यावेळी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.यात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन राख रांगोळी झाली.