पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क
गणेश कला क्रीडा मंच येथे राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव,पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पुणे बालपुस्तक जत्रा' या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भेट दिली.
मोबाईल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या(एआय) युगात आपली मातीशी असलेली नाळ तुटू नये,याची काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी मुलांना लहान वयापासूनच पुस्तके आणि वाचनाच्या सवयींकडे वळवणे अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळे ही बालपुस्तक जत्रा केवळ पुण्यापुरती मर्यादित राहू नये. बालपुस्तक जत्रा विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर पोहोचवण्यासाठी शिक्षण विभाग पुढाकार घेईल,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक . राजेश पांडे, बालभारतीचे संचालक .कृष्णकुमार पाटील, किशोर मासिकाचे संपादक . किरण केंद्रे,विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य. सागर वैद्य,.प्रसेनजित फडणवीस आणि संवाद पुणेचे. सुनील महाजन उपस्थित होते.
या कार्यक्रमात किशोर मासिकाच्या नव्या अंकासह 'साने गुरुजी' आणि 'श्यामची आई' या पुस्तकांच्या इंग्रजी भाषेतील अनुवादित आवृत्त्यांचे प्रकाशनही करण्यात आले.