अहिल्यानगर प्रतिनिधी महिला सशक्तीकरण राष्ट्रीय ॲम्बेसेडर तसेच पर्यावरण मंत्रालय सहाय्यक निदेशक, मिसेस इंडिया इंटरनॅशनल विजेता जोधपूर येथील सिध्दी जोहरी यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटीचें आयोजन कृषीभुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ.विठ्ठलदास आसावा यांचे समवेत करण्यात आले होते.
प्रसंगी काठमांडू येथील नवीना सोमाणी यांची देखील यावेळी उपस्थिती होती.भेटी दरम्यान पर्यावरण संतुलन विषयावर सखोल चर्चा झाली.प्रदुषणामुळे होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाय याविषयी सुचना यावेळी करण्यात आल्या.याप्रसंगी १६ देशांचा सोळा हजार किलोमीटर प्रवास ४९ दिवसांत पूर्ण करत विक्रम करणारे अनुराग श्रीवास्तव सहभागी झाले होते.
सिध्दी जोहरी या प्रेरक वक्ता असुन भारत नेपाळ हरीत चळवळ तसेच राष्ट्रीय आरोग्य शिक्षण ॲम्बेसेडर म्हणून त्या काम पहात आहेत.
अभ्यास दौरा आयोजन प्रदेशाध्यक्ष मधुसुदन गांधी यांच्या सुचनेनुसार सुहास सिकची,संदिप अट्टल,गिरीष बंग यांनी केले होते.
