नाशिक शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी संघटनात्मक आढावा बैठक

Cityline Media
0
नाशिक प्नतिनिधी नाशिक शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी संघटनात्मक आढावा बैठक नुकतीच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाणकर  यांच्या उपस्थितीत नाशिक येथे पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक यशस्वीरित्या पार पडली.
या बैठकीत पक्ष संघटन अधिक बळकट करणे,महिलांचा पक्ष कार्यात जास्तीत जास्त सक्रीय सहभाग वाढवणे, पक्ष विस्तारासाठी धोरणात्मक उपाययोजना आखणे इत्यादी महत्त्वपूर्ण विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.

ही बैठक संघटनात्मक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी ठरली असून, कार्यकर्त्यां मधील ऊर्जा,बांधिलकी आणि एकजूट स्पष्टपणे दिसून आली.महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली सजगता आणि नेतृत्वगुण निश्चितच पक्षाच्या पुढील वाटचालीस बळकटी देतील.

या बैठकीस. विष्णुपंत म्हैसधुने,  रविंद्र पगार,.रंजन ठाकरे, प्रेरणा बलकवडे,जयश्री पालवे,योगिता आहेर,शोभा पगारे,अश्विनी मोगल,ज्योती वाकचौरे,मनिषा देसले, निर्मला सावंत, आशा भंदूरे, मेधा दराडे, योगिता पाटील व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी रुपाली चाणकर म्हणाल्या की मला पूर्ण विश्वास आहे की नाशिक मधील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी संघटन अधिक परिणामकारक व जनतेशी जोडलेले कार्य उभे करेल.

 बैठकीचे नियोजन महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे व शहराध्यक्ष योगिता आहेर यांनी केले होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!