स्वप्निल सोनार यांची श्रीरामपूर शहराध्यक्षपदी निवड

Cityline Media
0
मनसेच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ
श्रीरामपूर दिपक कदम: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या श्रीरामपूर शहराध्यक्षपदी स्वप्निल सोनार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच मनसे नेते व अहिल्यानगर जिल्ह्याचे निरीक्षक बाळा नांदगावकर यांच्या सूचनेवरून मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे सदर निवड जाहीर केली आहे.
 स्वप्निल सोनार
ही नियुक्ती केवळ औपचारिक नसून, संघटनात्मकदृष्ट्या शहरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या अनुषंगाने श्रीरामपूर सारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि प्रबळ मतदारसंघ असलेल्या शहरात स्वप्निल सोनार यांच्यावर पक्षाच्या शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्वप्निल सोनार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, "माझ्यावर टाकलेला विश्वास आणि जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. मनसेच्या भूमिकेला योग्य ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी मी वचनबद्ध आहे. श्रीरामपूर शहरातील जनतेच्या प्रश्नांवर आम्ही आंदोलनात्मक आणि रचनात्मक अशा दोन्ही पद्धतीने लढा देणार आहोत." त्यांनी पुढे सांगितले की, "सध्या शहरात अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. पाणीटंचाई, अपुरी आरोग्यसेवा, रस्त्यांची दुरवस्था, वाढती बेरोजगारी, तरुणांमध्ये वाढणारा नैराश्याचा कल याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन एकत्रितपणे कार्ययोजना आखण्यात येईल." पुढे बोलताना ते म्हणाले मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व जिल्हा अध्यक्ष बाबसाहेब शिंदे यांनी दिलेल्या जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडेल व संपूर्ण शहरात पक्ष संघटना नव्याने बांधून येत्या नगरपालिका निवडणुकीत मनसे पक्षाचे उमेदवार निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असे मत नवनियुक्त शहराध्यक्ष स्वप्नील सोनार यांनी व्यक्त केले  

 याप्रसंगी गौरव डेंगळे, अनिल बागुल, नितीन क्षीरसागर, सुनिल क्षीरसागर, प्रविण जमदाडे, दिपक कदम, विनोद वाघमारे, निरज शहा, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!