संगमनेर प्रतिनिधी उत्कृष्ट निकालासाठी नेहमी अव्वल राहिलेल्या येथील ज्ञानमाता विद्यालयाचा ९८.३६ टक्के निकाल लागला असून आजी माजी शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये समाधान आणि चैतन्य निर्माण झाले आहे.
विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकालाच उत्कृष्ट परंपरा यंदाही जपली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ शालांत प्रमाणपत्र बोर्ड परीक्षा मध्ये ज्ञानमाता विद्यालयातील १० वी इयत्तेत एकूण १८४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३८ विद्यार्थी विशेष श्रेणीत, तर ६५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये कुमारी तन्वी रमेश घोटेकर हिने ९३.४० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे,तर कुमारी श्वेता शंकर थोरात या विद्यार्थिनीने ९२.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच कुमारी माळी श्वेता राजेंद्र माळी ह्या विद्यार्थिनीने ९१.००% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तर कुमारी स्वामिनी नवनाथ भवर आणि कुमारी शुभांगी राजेश सानप या दोन्ही विद्यार्थिनींनी ८८.४० टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे.आणि चि.ऋषिकेश संतोष डांगे हा विद्यार्थी ८७.२०% गुण मिळवून पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
सर्व गुणवंत तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानमाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य फादर फ्रान्सिस पटेकर, ज्ञानमाता संकुलाचे व्यवस्थापक फादर ज्यो गायकवाड, उपप्राचार्या सौ.अर्चना डोंगरे, ज्ञानमाता कॉन्व्हेंटचे इन्चार्ज फादर प्रशांत शहाराव, ज्युनियर कॉलेज इन्चार्ज सौ.शारदा नवले , तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या आहेत.