श्रीरामपूर दिपक कदम -- महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या सहकार्याने श्रीरामपूर येथील संत लोयोला चर्च श्रीरामपूर येथे सोलर हाय मॅक्स लाईटचे उद्घाटन लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर प्रकाश भालेराव यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
प्रसंगी कमलाकर पंडित यांनी प्रास्ताविक करतांना म्हटले की, रात्रीच्या वेळी चर्चला व कॉलेज रोडकडे जाणाऱ्या नागरिकांची लाईट अभावी कुचंबणा होत असे , परंतु मनोज नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्ट मंडळ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले असता त्यांनी त्वरित संत लोयोलाला चर्च समोर सोलर हाय मॅक्स लाईटची व्यवस्था पुरवली त्याबद्दल राधाकृष्ण विखे पा यांचे तसेच या कामी आझाद मैदान येथील मानाचा गणपतीचे अध्यक्ष मनोज नवले यांचेही सहकार्य लाभले या दोघांचेही आभार संत लोयोला चर्चच्या वतीने कमलाकर पंडित यांनी मानले
यावेळी रेव्ह फा.प्रकाश भालेराव मनोज नवले भाजप जिल्हा सरचिटणीस व उत्तर महिला मंच पुजा कांबळे राफोल भवनच्या सिस्टर रिटा कनोसाच्या सिस्टर निर्मला ,कमलाकर पंडित, विजय त्रिभुवन, लाजरस गायकवाड, दीपक कदम, सुरेश ठुबे ,लेवीन भोसले, फ्रान्सिस शेळके, निशिकांत पंडित, जेम्स पंडित, शिंदे,फ्रान्सिस कदम,विलास बनसोडे, जगदीश बनसोडे, जाॅन पंडित सौ. शोभा त्रिभुवन, पुष्पा साठे, प्रतिमा पंडित चर्चे अनेक भाविक याप्रसंगी उपस्थित होते