नाशिक दिनकर गायकवाड- वेगवेगळे ओटीपी घेऊन डॉक्टर दाम्पत्याची साडेसोळा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नाशकात उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,की फिर्यादी ६४ वर्षीय डॉक्टर यांच्या पाणीचे धुळ्यातील देवपूर येथे स्टेट बैंक ऑफ इंडियामध्ये खाते आहे. ते नाशिकच्या शिवाजीनगर शाखेत त्यांना वर्ग करायचे होते. त्यासाठी
त्यांनी पुण्यातील ग्रंथ मॅनेजर या मोबाईल नंबर गुगलवर शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी ९३६५०६०३६६, अशा नंबर त्यांना दिसून आला. फिर्यादी यांनी या नंबरवर संपर्क साधला असता त्यांना समोरील व्यक्तीने बैंक खात्यासंदर्भात वेगवेगळी माहिती विचारली, समोर बँकेचे अधिकारी बोलत असल्याचे समजून फिर्यादीने विश्वासाने सर्व माहिती समोरच्या व्यक्तीला दिली. त्यांनी फिर्यादी
यांच्या मोबाईलवर वेगवेगळे ओटीपी पाठवून त्यांच्या खात्यातून १६ लाख ६४ हजार ९९९ रुपये काढून घेतल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. हा सर्व प्रकार दि. २ मे ते ३ मे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी सायबर पोलीस डाण्यात अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.
