नाशिक दिनकर गायकवाड हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या कारची काच फोडून ३ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की सोनल राजेंद्र बेंडे (वय २३) यांनी एमएच १५ एचक्यू ७०५० या क्रमांकाची किया सोनेट कार गौळाणे रोडवरील हॉटेल फार्म फिफ्टीनच्या बाहेर पार्क केलेली होती. दि. ८ मे रोजी रात्री ८ ते सव्वादहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कारच्या मागील दरवाजाची काच फोडून कारमध्ये ठेवलेल्या पर्समधून १ लाख ४७हजार ७५० रुपये रोख, ३९ हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम वजनाचे
मंगळसूत्र, १० हजार रुपये किमतीचे ३ ते ५ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, चार एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व पर्स असा एकूण ३ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.बेंडे यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
