राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतले श्री.साईबाबा समाधीचे दर्शन

Cityline Media
0
शिर्डी दिपक कदम राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.
प्रसंगी उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर शेरेबुकात अभिप्राय नोंदवला. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर भारताच्या नवोत्‍थानाचा पाया या नात्याने भारतभर समाजाचे प्रबोधन  अध्यात्म तत्त्व आणि व्यवहार या मूलभूत घटकाचे ज्या ईश्वरीय योजनेने झाले त्याचा एक भाग म्हणजे शिर्डीचे साईबाबा होत, देह त्यागानंतरही त्यांची तपस्या अनेकांना वरील दृष्टीने पथदर्शक ठरते ही प्रचिती आहे अशा श्री बाबांच्या समाधी मंदिराचा नित्य कार्ये विकास व त्याचे नित्य उत्तम व्यवस्थापन करणाऱ्या सर्व कार्यकर्ता मंडळींना त्यांनी मनापासून धन्यवाद दिले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!