चणेगाव इंद्रभान ढमक संगमनेर तालुक्यातील चणेगाव पंचक्रोशसाठी पूर्वीपासूनच शैक्षणिक दृष्ट्या सर्वोत्तम असलेल्या लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री रामेश्वर विद्यालय चनेगाव येथील माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ८१.८१ शेकडा लागला असून गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
प्रथम क्रमांक पुजा कैलास बढे ६७.८० शेकडा गुण
इंग्रजी माध्यमाच्या स्पर्धेत चनेगावच्या श्री.रामेश्वर विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेने सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे येथील शिक्षकांची मेहनत व अभ्यास करून घेण्याची दक्षता यामुळे येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे
त्यात कुमारी पुजा कैलास बढे हिने ६७.८० शेकडा गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर चि.देव अविनाश लोहाळे याने ६२.६० शेकडा गुण मिळवून दुतीय क्रमांक प्राप्त केला आहे तर कुमारी आरती शरद माळी हिने ६१.२० शेकडा गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने तसेच चणेगाव येथील गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले यावेळी स्थानिक स्कुल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी सदिच्छा दिल्या चनेगावच्या श्री.रामेश्वर विद्यालयाच्या गुणवत्तेसाठी शालेय विकासासाठी झटणाऱ्या गावातील युवक कार्यकर्त्यांचे देखील कौतुक होत आहे.