नाशकातील फरार आणि तडीपार आरोपी पुन्हा जेरबंद

Cityline Media
0
गुन्हे शाखा युनिट-२ च्या कामगिरीचे कौतुक 
 नाशिक दिनकर गायकवाड गेल्या तीन वर्षापासून विनयभंगाच्या गुन्ह्यात फरार असतेला आणि दोन वर्षाकरिता नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आलेला आरोपी गणेश तुळशीराम लिपणे यास गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने नुकतीच अटक केली.शहरातील माफियाचे धाबे दणाणले आहेत.
दोन वर्षांकरिता नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आलेला आरोपी गणेश तुळशीराम निपणे हा पाथर्डी फाटा परिसरात फिरत असल्याची गोपनिय माहिती युनिट क २ च्या पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आनंदनगर,पाथर्डी फाटा,नाशिक परिसरात सापळा रचून आरोपी गणेश लिपणे याला अटक केली.

गणेश लिपणे हा आरोपी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात फरार होता. त्याच्यावर नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपाराची कारवाई झाली होती.तरीही त्याने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शहरात वावर केल्याने त्याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कामगिरीत स.पो.नि.हेमंत लोहकर (प्रभारी अधिकारी),पोलिस उपनिरीक्षक मुक्कारखान पठाण,यशवंत बैंकी संजय सानप,परमेश्वर दराई, सुनिल आहेर,चंद्रकांत गवळी वात्मिक चव्हाण,मनोहर शिंदे व इतरांचा सक्रिय सहभाग होता.आरोपीला पुढील चौकशीसाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!