केरळ सिटीलाईन न्यूज नेटवर्क
ऑल इंडिया व्हॉलीबॉल स्पर्धा सेंट जोसेफ स्टेडियम,केरळ येथे मागील तीन दिवसापासून सुरू आहे.आज झालेल्या सामन्यात बँक ऑफ महाराष्ट्रने सीआरपीएफवर मात करत अंतिम फेरीत धडक
बँक ऑफ महाराष्ट्र संघाने सीआरपीएफचा १९-२५, २५-१७, २५-२० आणि २५-०९ असा पराभव करत शानदार विजय मिळवला.
या सामन्यात मारिया सायबी,अनन्य, श्री जानाई आणि रक्षाने उत्कृष्ट कामगिरी केली.या ऑल इंडिया व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपमध्ये देशभरातून सहा संघ सहभागी झाले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र संघाने स्पर्धेत आत्तापर्यंत उत्तम कामगिरी केली असून,ज्येष्ठ व्हॉलीबॉल प्रशिक्षक.देविदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे.अंतिम सामना गुरुवारी केएसईबी केरळ संघाविरुद्ध खेळवला जाणार आहे.
