चालत्या दुचाकीवर झाड कोसळले; नाशिकच्या दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड येथील देवळाली गाव,राजवाडा परिसरातून सातपूर येथे कंपनीत कामाला जाणाऱ्या युवकाच्या चालत्या गाडीवर झाड कोसळून दोघां युवकांचा दुर्दैवी मृत्यू, झाला. दोघे युवक कुटुंबात एकुलते एक असून या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
देवळाली गाव येथील मातोश्री रमाई आंबेडकर,नगर मालधक्का रोड गुलाबवाडी येथील गौरव भास्कर रिपोर्टे व सम्यक भोसले हे वीस वर्षीय युवक सातपूर परित्तरातील कामगार हॉस्पिटलच्या मागे असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कीडा संकुलाच्या गेट समोरून कंपनीत रोजंदारीवर कामासाठी जात होते. त्याच वेळेस अचानक या ठिकाणी असलेले जुनाट व वाळलेले मोठे झाड अचानक मुळासकट उखडून त्यांच्या ॲक्टिवा (एम.एच १५ व्ही डब्लू ०५६५ या दुचाकीवर पडले. त्यात एका युवकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की,झाड पडल्यानंतर या युवकांना वाचवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, काहींनी १०८ॲम्बुलन्सला फोन केला. मात्र त्यांनी येण्यास टाळाटाळ केल्याने त्यांना कामगारांनी खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले.ही घटना नुकतीच घडली.दोघे तरुण मित्र होते व कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ते सोबतच कंपनीत रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळत होते. घटनेची माहिती समजताच राजवाडा मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.मृत युवकांच्या कुटुंबाचा आक्रोश पाहून उपस्थित डोळे पाणावले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मनपाने वेळीच जुनाट व धोकेदायक वृक्ष काढून टाकले असते तर या युवकांचा प्राण वाचले असते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!