प्लास्टिक कचऱ्याची घट होत नसल्याच्या नियोजनाअभावी राष्ट्रीय पर्यावरणाची हानी-डॉ.ताडपत्रीकर

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड) कौलाघात धकाधकीच्या आणि गतिमान जीवनात प्लास्टिक शिवाय कुणाला पर्याय उरला नाही.एकीकडे प्लास्टिकच्या दैनंदिन वापरामुळे पर्यावरणाची हानी होत आहे.जरी वस्तुस्थिती असली तरीही वापरलेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या नियोजनअभावी खन्या अथनि पर्यावरण धोक्यात आले आहे,असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय पर्यावरण डॉ.मेधा ताडपत्रीकर यांनी केले.
गोदाघाटावर सुरू असलेल्या देव मामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे स्व. निर्मलाताई दातार स्मृती व्याख्यानात बारावे पुष्प गुंफताना'लास्टिक वरदान आणि धोका' या विषयावर त्या बोलत होत्या.

ताडपत्रीकर पुढे म्हणाल्या की, प्लास्टिकचे विघटन लवकर होत नाही.मागच्या ५० ते ६० वर्षापूर्वी प्लास्टिक आपल्या जीवनात आले आणि आजच्या वर्तमानात आपल्या जीवनाचा ते एक भाग होऊन बसले.आज अन्न धान्यापासून वैद्यकीय क्षेत्रातील औषधोपचार,वाहतूक विविध दुचाकी चार चाकी गावांचे स्पेअर पार्ट तर खाद्यपदापासून वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतीपर्यंत अनेक उत्पादने प्लास्टिक शिवाय निर्माण होऊ शकत नाही.याकडे त्यांनी लक्ष वेधले.मात्र एकीकडे प्लास्टिक पर्यावरणाला जरी घातक जात असले तरी जीवनाची आणि जगण्याची सर्व क्षेत्र प्लास्टिकने व्यापली आहे.तो आपल्या जगण्याचा एक भाग झाला आहे, त्यामुळे आपण प्लास्टिकला वाईट म्हणून कसे चालेल? प्लास्टिक सोबत जगणे आणि प्लास्टिकसोबतच मरणे हे आज आपल्या वाट्याला आलेला आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्लास्टिकच्या वापराने अधिक टिकाऊ डांबरी रस्ते बनतात, असेही त्यांनी सांगितले. पास्टिकचा कचरा हा संकलित झाल्याने तो प्रदूषणाला घातक आहे.मात्र जर तो नियोजनपूर्वक संकलित केला तर त्यातून अनेक वस्तू तयार होतात.अनेक व्यवसाय त्यावर आज उभे राहिलेले आहे.

प्रमुख मान्यवरांचे स्वागत तसेच परिचय अध्य श्रीकांत वेगी यांनी केला प्रारंभी स्व. निर्मलाताई दातार आली व मान्यवरांच्या उपस्थित त्यांच्या प्रतिमेस त्याचबरोबर भगवान गौतम बुद्ध प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.डॉ.मेधा ताडपत्रीकर यांचा संगीता बाफना यांनी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.

व्याख्यानमाला नंतर मेलडीयस करा ओके क्लब व कार्यक्रम पार पडला.यात सुधीर बोरुडे,राज अकर,नवनाथ पारखे, दीनी सदारंगानी, शुभांगी कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, पौर्णिमा गुप्ता आदींनी सहभाग नोंदवला.

आजचे व्याख्यान स्व. मुळचंदभाई गोठी
स्मृतीव्याख्यान,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर हे व्याख्यान देणार आहेत. युनिक स्टार ग्रुप प्रस्तुत 'हिट्स ऑफ राज कपूर' हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर होईल.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!