परळी सिटीलाईन न्यूज नेटवर्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.तसेच त्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास आराखड्यातील कामांची पाहणीही केली. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे आमदार विक्रम काळे आदी उपस्थित होते.
उपस्थितांसमवेत त्यानंतर त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योर्तिंलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,ही कामे दर्जेदार,गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथेच परळी औष्णिक विद्युत केंद्राअंतर्गत सुरू असलेल्या कामाचाही आढावा घेतला. विद्युत केंद्राच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.