आमदार अमोल खताळाची संगमनेरात भारतीय सैन्यदलाच्या समर्थनार्थ विजयी तिरंगा रॅली
संगमनेर संपत भोसले- जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी २७ निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला होता.त्या दहशतवादी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कर ,वायुदल आणि नौदल या तिन्ही दलाच्या सैनिकांना प्रोत्साहन दिले म्हणून त्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर देत चांगलाच धडा शिकवला. म्हणून भारतीय तीनही सैन्यदलाच्या समर्थनार्थ,त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच भारतीय नागरिकां च्या सुरक्षेसाठी संगमनेर शहराच्या विविध भागातून विजयी तिरंगा मोटारसायकल रॅली काढून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
संगमनेर शहरातील नगरपालिकेच्या जवळील लालबहादूर शास्त्री चौकामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंगदल महायुतीचे सर्व कार्यकर्ते तसेच देशप्रेमी नागरिक एकत्र आले.आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी सौ.नीलम खताळ यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दहशतवादी हल्ल्यामध्ये ठार झालेल्या पर्यटकांच्या तसेच हल्ल्यास प्रतिउत्तर देताना युद्धाच्यावेळी शहीद झालेल्या जवानांच्या प्रति श्रद्धांजली अर्पण केली आणि महाराष्ट्र गीताने या विजयी तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. यावेळी भारत माता की जय ...वंदे मातरम..... अशा जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण शहर दणाणून सोडले होते.आमदार अमोल खताळ स्वतःमोटरसायकलवर बसून या विजयी तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते त्यांच्या समवेत कुलदीप ठाकूर, श्रीकांत गोमासे,गुलाब भोसले,पायल ताजणे, राहुल भोईर,शशांक नामन,दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रामभाऊ राहणे कैलास कासार यांच्यासह महा युतीचे कार्यकर्ते तरुण-तरुणी व महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करून आलेल्या या विजयी तिरंगा रॅलीची नवीन नगर रोडवरील प्रांताधिकारी कार्यालया समोर राष्ट्रगीताने सांगता झाली.
ही मोटार सायकल विजय तिरंगा रॅली शहरातील माळीवाडा,मेनरोड ,दिल्ली नाका, नवघर गल्ली छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बसस्थानक नवीन अकोले रोड ,बीएड कॉलेज रोड, श्रमिक मंगल कार्यालय ,राहणे मळा, गणेश नगर नासिक रोड ,जुना निमोण नाका ,साई श्रद्धा चौक, तिरंगा चौक, मालदाड रोड शिवाजीनगर ,जाणता राजा रोड मार्गे या तिरंगा रॅलीची नवीन नगर रोडवरील प्रांता धिकारी कार्यालय येथे सांगता झाली
पाकिस्तानशी युद्ध करताना भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही
देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी भारतीय लष्कर वायू आणि नऊदल या तीनही सैन्यदलाला प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांनी पाकिस्तानचे कंबरडे मोडले.अन त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली. तसेच त्यांनी इतर देशांची मध्यस्थी करून गुडघे टेकत युद्धविरामा च्यादृष्टीने चर्चा करून भारतापुढे त्यांनी शरणागती पत्करली .पाकिस्तानशी युद्ध करताना जे भारतीय जवान शहीद झाले त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाही.
यापुढे पाकिस्ताने जर पुन्हा दहशतवादी हल्ला केला तर त्यांना यापेक्षा ज्यास्त ताकदीने प्रतिउत्तर देण्यासाठी भारत सक्षम आहे
आमदार अमोल खताळ
सदस्य - महाराष्ट्र राज्य विधानसभा संगमनेर