नाशिक दिनकर गायकवाड येथील इंदिरानगर बोगद्याजवळ झालेल्या दोन गटांच्या भांडणात प्राणघातक हत्याराने आणि लाकडी दांडक्याने एकमेकांवर वार करून परस्परांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौथा आरोपीना गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने अटक केली आहे.
गेल्या रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास इंदिरानगर बोगद्याजवळ इनायत कॅफे परिसरात काही महिला व पुरुषांमध्ये बाचाबाची होऊन एकमेकांना लाकडी दांडक्याने व धारदार हत्याराने मारहाण केली होती. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबत एका गटाने दीपक कपिले या इसमाच्या गळ्यावर वार करून डाव्या कानाला चावा घेऊन गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयान केला, अशी तक्रार मुंबई नाका पोलिसांकडे दाखल झाली होती, तर दुसऱ्या गटाने दीपक कपिले व दीपक आंधळे यांनी रोहित गोरडे यास लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने गंभीर जखमी करून जिये ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशा स्वरूपाची तक्रार दाखल झाली होती.
घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा उपायुक्त प्रत्तांत बच्छाव व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी दिले होते.
या अनुषंगाने संशयितांची माहिती काढत असता गुन्हे शाखा युनिट १च्या पालादारांमपोलीस नाईक विलिंदसिंग परदेशी यांना खबयामार्फत माहिती मिळाली, की या गुन्हातील पाहिजे आलेला आरोपी रोहित गोयो आणि एक महिला आरोपी त्रिमूर्ती चौक, सिडको येथे आहेत, तर दुसरी महिला आरोपी जुनी तांबट शिवाजी चौक येथे त्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र
बागूल, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक वेतन श्रीवत, उपनिरीक्षक सुदामांगहार प्रांत गरकड, विशाल काते, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, बोगीराज गायकवाड, नाझिषखान पठाण, पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेसी, विशाल देवरे, अंमलदार अमोल कोही जगेश्वर बोरसे, महिला सवालदार शर्मिला कोकणी, अंमलदार अनुजा येलवे, तसेच पोलीस उपनिरीक्षक किरण मिस्साठ व अंमलदार समाधान पवार यांचे पथक तयार करून संशयितांबा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार विमूर्ती चौक परिसरात तपास केला असता दीपक उर्फ रोहित रवींद्र गोर (वय ३२, रा. त्रिमूर्ती बौक, सिडको) व आणखी एक महिला यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
तनीय आणखी एक आरोपी महिला इच्छामणी प्राईड, जुनी तांबट लेग, जुने नाशिक येथे असल्याचे समजता तिलाही ताब्यात घेण्यात आले. या महिलेनेदेखील गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबूल केले आहे.
दुसऱ्या दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी दया आंधळे हा चोपडा लॉन्स परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस नाईक विशाल देवरे यांना त्यांच्या या मिळाली तेथेही पोलिसांनी पाहिजे असलेला आरोपी दिगंबर ऊर्फ दत्ता निवृत्ती आंधळे (वय ३४, रा. राजमती रो हाऊस, कलानगर, दिंडोरी रोड) यारा चोपडा लॉन परिसरातून ताब्यात घेतले. यावेळी आंधळेसह त्याचा मित्र दीपक कपिले शिवतीनाथ गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी युनिट-१ च्या पथकाचे अभिनंदन केले आहे.