जुना बॉम्ब तोडण्याच्या नादात एकाचा स्फोटात मृत्यू

Cityline Media
0
अमृतसर सिटीलाईन न्यूज नेटवर्क- येथे काल सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बॉम्बचा स्फोट झाला. 
जो व्यक्ती बॉम्ब ठेवण्यासाठी आला होता,त्याचा हातातच बॉम्ब फुटल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलीस घटनास्थळी पोहचले असून चौकशी सुरु केली आहे.
 अमृतसर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडली.
 यासंदर्भात पोलिसांकडून अजून काहीही माहिती देण्यात आली नाही.
प्राथमिक चौकशीत पोलिसांनी गँगस्टर किंवा दहशतवादी गटाने हा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.या स्फोटात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला,तो भंगार घेणारा असल्याचे सांगितले जात आहे.जुना बॉम्ब तोडण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी गर्दी नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!