जोर्वे (प्नतिनिधी संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील समता विद्या मंदीर व शिल्पवेत्ता मधुकरराव संतुजी थोरात कनिष्ठ महाविद्यालय शाळेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत भरघोस यश संपादन केल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे इयत्ता पाचवी व इ.आठवी चे एकुण नऊ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यात चि.करण अण्णासाहेब काकड इयत्ता ८वी १८० गुण, कु.प्रतिक्षा अशोक थोरात इयत्ता ८वी १७६ गुण,साहिल संजय वाघचौरे इयत्ता ८वी १६४ गुण,कबीर रामदास काकड इयत्ता ८वी १५० गुण,दिशा नारायण जोर्वेकर इयत्ता ८वी १४८ गुण,आर्यन बाळासाहेब बुरकुल इ.५वी १७२ गुण,जयवर्धन जीवन यादव इ.५वी १७२ गुण,दुर्वा दिपक दिघे इ.५वी १५६ गुण,कृष्णा निलेश काकड इ ५ वी १३८ गुण प्राप्त गुणांनी घवघवीत यश मिळविले आहे.
विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास, चिकाटीआणि आत्मविश्वासाने हे यश प्राप्त केले आहे.तसेच या यशात मोलाचा वाटा उचलणारे पर्यवेक्षक यु.के.उगले प्राचार्य जे.जी.पोखरकर सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रसंगी आभार व्यक्त करण्यासात आले.
शिक्षण हेच सामर्थ्ये आणि सामर्थ्ये घडवणारे शिक्षक हेच खरे शिल्पकार असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी सदस्य,शिक्षक, कर्मचारी वृंद तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य शिक्षक पालक संघ अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सदस्य जोर्वे चे सरपंच,उपसरपंच सदस्य ग्रामस्थ पालक सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले
