अहिल्यानगर दिपक कदम अहिल्यानगर जिल्हाधिकारी येथील कार्यालयात जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक उत्साहात नुकतीच पार पडली.
जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने तसेच पायाभूत सुविधांच्या मजबूती करणासाठी निधीची विशेष तरदूत यावेळी करण्यात आली प्रसंगी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील
यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीची विशेष बाब म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता शिर्डी आणि अहिल्यानगर येथे वसतिगृहाची तसेच अभ्यासिकेची सुविधा निर्माण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
उपस्थित लोकप्रतिनीधीनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव जिल्ह्याच्या विकास आराखड्यात करण्यात येणार असून,लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्रित समन्वयाने शासन योजनावर काम करण्याचे आवाहन करण्यात केले.
या बैठकीला खासदार भाऊसाहेब वाकचौरे,आमदार शिवाजीराव गर्जे आमदार नरेंद्र दराडे आमदार सत्यजित तांबे आमदार मोनिका राजळे,आमदार विठ्ठलराव लंघे आमदार डॉ. किरण लहामटे आमदार काशिनाथ दाते आमदार विक्रम पाचपुते आमदार अमोल खताळ यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीची विशेष बाब म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता शिर्डी आणि अहिल्यानगर येथे वसतिगृहाची तसेच अभ्यासिकेची सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.उपस्थित लोकप्रतिनीधीनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव जिल्ह्याच्या विकास आराखड्यात करण्यात येणार असून,लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्रित समन्वयाने शासन योजनावर काम करण्याचे आवाहन केले.
