ठाणे विशाल सावंत-ठाणे लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेल्यानंतर पहिल्या पंचवार्षिक मध्ये आणि तेही पहिल्याच वर्षी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत आपल्या कामाची चुणूक दाखवली त्यांच्या कामाची आणि तत्परतेची दखल घेऊन नुकताच त्यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न असोत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण असोत खासदार नरेश मस्के यांनी संसदेत सर्वसामान्य लोकांशी निगडित विविध विषयांची मांडणी करत ते मार्गी कसे लागतील याचा पाठपुरावा करण्यात ते नेहमी आग्रही आहे.त्यांच्या या उत्कृष्ट अशा कामगिरीची दखल घेऊन त्यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर होताच त्याचे संसदेतील सहकारी लोकसभा अध्यक्ष व ठाणे लोकसभा मतदारसंघातील जनतेने त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.