विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे जनता त्रस्त
लोहगाव (प्रतिनिधी) राहता तालुक्यातील प्रवरानगरच्या तांबे नगर येथील रोहित्र खराब झाल्याने येथील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे येथील व्यापारी पेठेत अंधाराचे पसरले आहे विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे प्रवरानगर परिसरात अनेकदा विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे.
१८ मे पासून हे रोहित्र बिघडल्याचे विद्युत महावितरण कंपनीला तक्रार निवेदनाद्वारे कळविले असता वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.
सदर रोहित्र हे गावठाण रोहीत्र आहे व संपूर्ण व्यापारी वर्ग या रोहित्राच्या विजेवर अवलंबून आहे त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून येथील व्यापारी वर्गाचे खूप नुकसान झाले आहे येथील नागरिक व व्यापारी यांनी उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज विद्युत महावितरण कंपनीला हे रोहित्र दुरुस्त करण्यासाठी तक्रार निवेदन सादर केले आहे तक्रार निवेदनावर येथील नागरिक व व्यापारी वर्गाच्या सह्या आहेत
विजेच्या चोरीमुळे रोहित्राची बिघाड
-तांबेनगरचा रोहित्रावर येथील विद्युत तंत्रज्ञ (वायरमन) यांनी चिरीमिरी घेऊन अनेक नागरिक आणि व्यापाऱ्यांना चोरीचे कनेक्शन दिले आहे त्याचा अतिरिक्त दाब येऊन येथील रोहित्र वारंवार खराब होते नागरिक दबक्या आवाजात चर्चा करताना दिसते.
गावकरी नुकतेच विज विद्युत महावितरण कार्यालयात अर्ज देण्यासाठी गेले असता तेथील दोन्ही कार्यकारी अभियंता हजर नसून येथील पाटोळे नामक वायरमन,कर्मचारी हजर होते परंतु त्यांच्या गळ्यात ओळख पत्र व महावितरणचा गणवेश घातलेला नव्हता नागरिकांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उत्तर असे मिळाले की आम्ही निवेदन वरच्या अधिकाऱ्यांकडे पाठवले आहे,गावकऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना फोन करून विचारले असता अधिकारी म्हणाले आम्हाला कोणतेही निवेदन भेटलेली नाही असे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळाले आणि बराच वेळ गेल्यानंतर कोणतेही दोन्ही कार्यकारी अभियंता ऑफिसला आले नसल्यामुळे श्री.पाटोळे यांच्याकडे निवेदन देऊन नागरिकांना परतावे लागले.