श्रीरामपूर दिपक कदम- सावकाश का? होईना अखेर दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या पवन सुपारी येथील अतिक्रमणात असणाऱ्या संपूर्ण दुकानांचे नुकतेच पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहीमेत जेसीबी चालवून काढण्यात आले.
प्रांताधिकारी किरण सावंत पाटील,मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप,पोलिस निरीक्षक.नितीन देशमुख यांच्या आदेशानुसार नगर अभियंता सूर्यकांत गवळी, अतिक्रमण विभाग प्रमुख संजय शेळके, महेंद्र ताकपिरे,अभिषेक मराठे, लक्ष्मण लबडे आदींनी या कारवाईत भाग घेतला.
मुख्य रस्त्यावरील अशोक उपाध्ये यांच्या मालकीच्या असलेल्या पवन सुपारी या दुकानापासून ते इब्राहीम पान स्टॉलपर्यंतच्या संपूर्ण दुकानांचे नुकतेच अतिक्रमण हटाव मोहीमेमध्ये काढण्यात आले.सदर अतिक्रमणधारक यांनी न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयात पालिकेच्या वतीने ॲड.मुकुंद गवारे यांनी कामकाज पाहिले.
