कोल्हापूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क कोल्हापूर येथे भाकप माले (लिबरेशन) ची जिल्हा कार्यकारणीची बैठक नुकतीच पार पडली.यावेळी भाकप माले (लिबरेशन) च्या कार्यालय फलकाचे उद्घाटन जेष्ठ पक्ष कार्यकर्ते जिल्ह्यातील रेंदाळ येथील कॉ.वसंत तांबे यांच्या हस्ते हार घालून पक्षाच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सचिव कॉ. प्रकाश जाधव,भगतसिंग ब्रिगेडचे अध्यक्ष कॉ.सतीश सर्वगोडे, कॉ. अतुल दिघे, कॉ. छापाखाने, श्रमिक शेतकरीचे कॉ.धोंडीबा कुंभार,कार्यकारणी सदस्य कॉ. सुरेश पाटील, कॉ.दिलीप लोखंडे, कॉ. एन. एस. मिरजकर, कॉ. प्रकाश कांबरे, कॉ. सुनील बारवाडे, कॉ,सुरेंद्र पाटील, महिला आघाडी अध्यक्ष कॉ.स्मिता आम्रे, कॉ.प्रीती सरदेसाई व कॉ. संगीता हुपरे कॉ. लता कदम आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी इन्कलाब झिंदाबाद,भाकप माले झिंदाबाद.अशा घोषणा देण्यात आल्या.
