ठाणे प्रतिनिधी ठाणे शहरातील लोकमान्य परिसरातील उबाठा आणि रिपाईच्या अनेक महत्त् महत्वाच्या नेते कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार, प्रदेशाध्यक्ष म्हणून मा.खा.सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या उपस्थितीत ठाणे शहरातील लोकमान्य नगर परिसरातील शिवसेना उबाठा गटाचे उपविभाग प्रमुख.सुभाष तायडे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे संघटक सचिव मंगेश सादरे आणि शिवसेना उबाठा गटाचे उपशहर महिला आघाडीच्या प्रवक्त्या कु.भारती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र. ६ व १४ मधील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी ठाणे शहर महिला अध्यक्षा सौ.वनिता गोतपागर, जिल्हा सरचिटणीस. प्रभाकर सावंत. रविंद्र पालव, राष्ट्रीय युवक सरचिटणीस. मोहसीन शेख, ठाणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष. संदेश पाटील आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
