-अन्यथा बौद्ध समाज मतदानावर बहिष्कार टाकणार- सुभाष त्रिभुवन
-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा तयार असताना उद्रेक झाल्यावर तो बसवणार का? बौद्धांचा संतप्त सवाल
श्रीरामपूर दिपक कदम येणाऱ्या नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतच्या निवडणुकीपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूरात बसवण्याच्या परवानगीचा आदेश जिल्हाधिकार्यांना तात्काळ द्यावा अन्यथा येथील बौद्ध समाज निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
तहसीलदार मिलिंद वाघ यांना तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट शहराध्यक्ष विजय पवार रॉकी लोंढे सुहास राठोड बाबासाहेब पवार बाळासाहेब जपे नवनाथ गुडेकर सुभाष गायकवाड प्रवीण विशाल सुरडकर मोजेस चक्रनारायण आदींच्या प्रमुख उपस्थितीत हे मागणीचे निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्रीरामपूर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रेल्वे स्टेशन समोरील जागेवर गेली पन्नास साठ वर्षा पूर्वी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा श्रीरामपूर नगर परिषदेने बसवलेला आहे त्याच जागेवर
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा ही बौद्ध समाजाची गेली अनेक वर्षापासून मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी पाच वर्षांपूर्वीच ठराव करून
नाशिक त्रंबकेश्वर येथील मूर्तिकार मैद यांना १३ लाख रुपये अदा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांझ धातूचा पूर्णाकृती पुतळा तयार केला आहे तसेच पोलीस प्रशासन सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सर्व शासकीय कार्यालयाचे ना हरकत दाखले तसेच वनविभागाचे त्या जागेचे निर्वाणीकरण झाले.
असल्याबाबतचे नोंद समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी श्रीरामपूर नगरपरिषद तसेच जिल्हाधिकारी यांना दिले आहे परंतु त्या ठिकाणी वन विभागाचे कारण सांगून जिल्हाधिकारी पुतळा बसवण्यास विनाकारण दुर्लक्ष व टाळाटळ करत आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा
पुतळा बसवण्यासाठी जलद गतीने परवानग्या मिळवल्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्या बाबत नुसती चालढकल सुरू आहे हा दुजा भाव करण्याचे कारण फार दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा श्रीरामपुरात व्हावा त्याबद्दल आंबेडकरी समाजाचं दुमत असण्याचं काही कारण नाही
परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागेवरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी परवानगीला वर्षापासून परवानगी मिळत नाही ही शोकांतिकाच म्हणावा लागेल म्हणून त्याबद्दल भीम अनुयायांच्या भावना तीव्र झाल्या आहे कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजाची अस्मिता आहे जर आमच्या अस्मितेला तडा जाणार असेल तर बौद्ध समाज येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकून सरकारचा निषेध करणार आहे.
आमदार हेमंत ओगले यांनी प्रसिद्धीसाठीच विधानसभेतील व्हिडिओ सोशल मीडिया फिरविला
-आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभा अधिवेशनात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपुरात बसवण्यासाठी चर्चा केली तो भाषणाचा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुवर फिरवला गेला परंतु पुढे त्या संदर्भात पाठपुरावा केला नाही त्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहे.
