सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन
राहाता प्रतिनिधी पालकमंत्री विखे यांच्या वाढदिवसानिमित्त तिसगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन वही वाटप तसेच सर्व रोग निदान शिबिर .
जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पा.,यांच्या वाढदिवसा निमित्त तिसगाव येथे
सर्व रोगनिदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. हा कार्यक्रम सौ धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला गावकऱ्यांच्या वतीने सौ.विखे यांचा सत्कार देखील करण्यात आला.
तसेच तिसगाव येथील संतोष ज्ञानदेव कडू व ग्रामपंचायत सदस्य योगिता संतोष कडू यांच्याकडून पहिली ते दहावी या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ! व शालेय मुलांना वही वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय मुलांना वही वाटप सौ.धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी बोलताना सौ.धनश्री विखे म्हणाल्या की चिमुकल्यांसाठी एक आदर्श म्हणुन आपल्या स्वतःच्या वाढदिवसाला देखील असेच उपक्रम घेतले पाहिजे.
यावेळी प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे व जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी ,अंगणवाडी सेविका,महिला बचत गट तसेच प्रवरा कारखान्याचे मा अध्यक्ष अण्णासाहेब कडू, संचालक विजय कडू, संजय नालकर, तिसगावचे सरपंच नानासाहेब डोंगरे, उपसरपंच उर्मिला रांधवणे, माजी सरपंच भास्कर घुले, प्रकाश नरोडे, प्रभाकर नरोडे, बंडूआप्पा कडू,गंगाधर घुले,डॉ.विक्रम नालकर, बबन रांधवणे,सोमनाथ कडू,सोपान डोंगरे, अजित घुले, मंदा रांधवणे, अनिता रांधवणे, सुप्रिया कडू, योगिता कडू तसेच अनेक मान्यवरांसह महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.