संगमनेरकरांनी केली आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अटकेची मागणी

Cityline Media
0
विविध संघटनांच्या वतीने प्रांताधिकारी यांना दिले निवेदन

संगमनेर प्रतिनिधी सांगली येथील घटनेला ख्रिस्ती धर्मगुरूंना जबाबदार धरून जो कोणी त्यांचा (जिवे मारील त्याला अकरा लाखाचे बक्षीस देण्यात येईल असे वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद, वंचित बहुजन आघाडी, दलित पँथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच अल्पसंख्याक समाजाच्या वतीने तीव्र निषेध  करण्यात आला असून अटकेच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी अरुण उंडे यांना नुकतेच देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, ख्रिस्ती समाज गेली काही वर्ष आपल्यावर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे मागणी करत आहे.परंतु परिस्थितीत बदल होताना दिसून येत नाही उलट पक्षी त्यात वाढ होत आहे त्यात काही लोकप्रतिनिधी उद्रेकी व चिथावणी खोर वक्तव्य जाहीर भाषणातून करीत आहेत.

आमदार पडळकरांच्या या निषेधार्थ वक्तव्यामुळे समाजकंटक व्यक्तींना प्रोत्साहन मिळते नुकताच हायकोर्टाचा एक निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल ठरवीत धर्मांतर म्हणजे नेमके काय हे स्पष्ट केले आहे तसेच कोणालाही कोणाच्याही धार्मिक बाबींमध्ये अडथळा आणणे,धार्मिक स्थळात घुसणे, उपासनेस विरोध करणे निषिद्ध ठरविले आहे.

लोकप्रतिनिधी गोपीचंद पडळकर यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे भविष्यात अन्याय आणि उद्रेकी कारवायांमध्ये जर अधिक गती आली तर नवल वाटायला नको, तरीही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याबद्दल समाजामध्ये तिव्र संतापाची लाट पसरली असून त्यांची आमदारकी रद्द करून त्यांना अटक करावी अशी मागणी ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, वंचित बहुजन आघाडीचे अजीज ओहरा, आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार,प्रा.बाबा खरात, मुरताज बोहरी, राजाभाऊ इनामदार, प्रभाकर चांदेकर, प्रशांत यादव, विनोद गायकवाड, सोन्याबापु वाघमारे, मच्छिंद्र वाघमारे, सचिन मुन्तोडे, भाऊसाहेब पवार, बी.के. गायकवाड,आसिफ शेख आदींनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!