मालेगाव प्रतिनिधी आज मालेगाव येथे महानगर तेली समाजाच्या वतीने १० वी व १२ वीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे समाजाचा गौरव वाढवला असून अशा होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हे आपले सामाजिक कर्तव्य असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष. हरिप्रसाद गुप्ता, अध्यक्ष. रमेश उचित, निवृत्ती बागुल, . राजेंद्र चौधरी, विद्यार्थी पालक व आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.