निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपक्रम
आश्वी संजय गायकवाड
अकोले तालुक्यातील श्रीक्षेत्र अगस्ती ऋषीं देवस्थानाच्या पंढरपुरला जाणाऱ्या पायी दिंडीतील वारकऱ्यांना समृद्धी मंगल कार्यालय निमगाव जाळी येथे मुक्कामी आली असता त्यांची तिथेच मोफत आरोग्य तपासणी करण्यात आल्याने वारकऱ्यांचा उत्साह वाढतांना दिसला.
छाया-दिपक महाजन
पंढरपूर आषाढी वारी निमित्त महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने आरोग्याची वारी पंढरीच्या दारीं हा उपक्रम हाती घेतला आहे त्या अनुषंगाने निमगावजाळी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत २६९ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली
यावेळी डॉक्टरांनी आपुलकीने चौकशी करत रक्तदाब.मधुमेह, ताप,पाठदुखी,सर्दी,खोकला यासह विविध रक्त तपासण्या मोफत केल्या तसेच वारकऱ्यांना दुखापत झालेल्या ठिकाणी मलमपट्टी देखील केली दिंडी प्रमुखांना आरोग्य केंद्राचे प्रमुुख डॉ.तय्यब तांबोळी आणि डॉ देविदास चोखर यांच्या हस्ते मोफत आरोग्य किट व औषध साठा देण्यात आला.
या प्रसंगी आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी सचिन गवारे,अविनाश तांबे,आरोग्य सेवक दिपक महाजन, प्रमोद साठे, वैभव सोनवणे, महेश पतंगे आरोग्य सेविका श्रीम शीतल निखाडे, आशा गट प्रवर्तक कल्पना डेंगळे व आशा कर्मचारी उपस्थित होते.