जालना प्रतिनिधी येथील शासकीय विश्रामगृहात नुकतेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा जालना शिक्षण विभागाची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक स्वागत करण्यात आले शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, शाळांचे विकासकामे आणि दर्जेदार शिक्षणाच्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली. आपल्या गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि मराठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन यावेळी केले.
शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहून आपल्या भागातील शाळांतील अडचणी मांडल्या. त्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण करण्याची ग्वाही दिली.
यानंतर रात्री उशिरा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन जिल्ह्यातील शाळांची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा यांचा आढावा घेतला. प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश दिले. यासाठी आवश्यक यादी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे सादर करण्याचे आदेश दिले. तसेच CSR फंडाचा योग्य वापर करून शाळांची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात यावा, असेही स्पष्ट केले.
शालेय शिक्षणात गुणवत्तेचा स्तर उंचावण्यासाठी स्थानिक पातळीवरील समस्यांचे त्वरित निराकरण करावे, अशा सूचनाही शिक्षण विभागाला दिल्या. शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले.