नाशिक दिनकर गायकवाड -बांधकामासाठी नेलेल्या सात लाखांच्या लोखंडी सेंटरिंग बांधकामाच्या प्लेटा परत न करता त्या परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विक्री केल्या प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रशांत रमणलाल साखला (रा. गुरुदत्तनगर, गंगापूर रोड) यांच्या ओळखीचे आरोपी अतुल तुकाराम बैताडे (रा. कुमावतनगर, पेठ रोड, पंचवटी) यांनी फिर्यादीच्या गोडाऊन मधून सात लाखांच्या एकूण ८७० सेंटरिंगच्या प्लेटा त्याच्या बांधकामाच्या साईटवर बांधकामासाठी दिल्या होत्या. या प्लेटा आरोपी बैताडे याने नेल्या मात्र या लोखंडी प्लेटा काम झाल्यानंतर साखला यांना परत न करता त्यांची परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली. या प्रकरणी अतुल बैताडे विरुद्ध पंचवटी पोलीस खाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
