संगमनेर किशोर वाघमारे अकोले तालुक्यातील खिरविरे गावचे सुपुत्र सध्या मुंबई येथील नायगाव बी.डी.डी.चाळ येथे रहिवाशी असणारे प्रमोद नारायण यांना नुकतेच महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभागात दिला जाणारा सन २०२४- २५ चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार नुकताच राज्य शासनाच्या वतीने मुंबई येथे जाहीर झाला आहे.
आज मंगळवार दि.१० जुन २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय शिरसाठ आदी प्रमुख मंत्री महोदय व शिवसेना अनुसूचित जातीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा सहप्रवक्ते उपनेते डॉ राजू वाघमारे यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ सन्मानचिन्ह धनादेश देऊन मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रमोद नारायण पराड व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
प्रमोद पराड यांनाहा पुरस्कार जाहीर झाल्याने मुंबई येथील नायगाव सह शहरातील आंबेडकर चळवळीमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना एक पुरस्कार मिळाल्याने आंबेडकर चळवळीतील एक सच्चा कार्यकर्त्याला न्याय मिळाला असल्याचे गौरवोद्गार बौद्ध समाजातील नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.
प्रमोद पराड १९६७ पासून आंबेडकर चळवळीमध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करत असून झोपडपट्टी चाळ पुनर्वसन जुन्या बिल्डिंग नवीन बांधणे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्याच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्यासह महापुरुषाच्या सार्वजनिक जयंती मोठा उत्साहात साजरा करणे आदी अनेक सामाजिक विषयावर त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्य मध्ये काम केले असल्याने त्यांच्या कामाचा ३० ४० वर्षाचा अनुभव विचारात घेता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
त्यांना पुरस्कार मिळाल्यामुळे अकोले तालुक्याच्या वतीने आमदार डॉक्टर किरण लहामटे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख डॉ.राजू वाघमारे शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे आईला नगरचे उत्तरेचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे दक्षिण विभाग प्रमुख सुभाष आल्हाट ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब काळे अकोले तालुकाप्रमुख जयवंत आढाव संगमनेर विधानसभा मतदारसंघ तालुकाप्रमुख गौतम रोहम डॉक्टर राजू वाघमारे यांचे स्वीय सहाय्यक कदम माजी नगरसेवक सुमित वाघमारे आदी मान्यवरांनी प्रमोद पराडे यांना त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देऊन अभिनंदन केले
