मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री गुरु तेग बहादुर ३५० शहीद समागम व गुरु गोविंद सिंग गुरुता गद्दी समागम कार्यक्रमाच्या आयोजनबाबत राज्यस्तरीय समितीची बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली. यावेळी त्यांनी उपस्थित संत-महंतांसमवेत संवाद साधला.
श्री गुरु तेग बहादुर साहेब यांचा ३५० वा शहीद आणि गुरुगोविंद सिंग जी यांचे ३५० वा गुरु ता गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन नांदेड,नागपूर व मुंबई या तीन ठिकाणी करण्यात येईल. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
संस्कृती आणि देशाच्या मजबुती करणासाठी लढणाऱ्या लोकांचा हा कार्यक्रम असणार आहे.वेगवेगळे समाज एकत्र येऊन हा समागम कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादुर साहेब व गुरुगोविंद सिंगजी यांचा इतिहास निश्चितच पुढील पिढीपर्यंत पोहोचविता येईल असे यावेळीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
