नागपूरच्या शांतीवन चिंचोली येथील बौद्ध विहारास आमदार रोहित पवारांची सदिच्छा भेट

Cityline Media
0
नागपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क येथील शांतीवन चिंचोलीच्या मातोश्री गोपीकाबाई बाजीराव ठाकरे यांनी दान म्हणून दिलेल्या जागेवर दिवंगत धम्म सेनापती वामनराव गोडबोले यांनी बौद्धविहार,शांतीकुटी आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं म्युझियम उभारलेय. या बौद्ध विहार आणि म्युझियमला नुकतीच आमदार रोहित पवारांनी सदिच्छा भेट देऊन म्युझियम मधील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या विविध ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली.
विशेष म्हणजे आपले संविधान ज्या टाईपरायटरवर टाईप झाले तो टाईपरायटर, बाबासाहेबांचा चष्मा,खुर्ची आणि इतर अशा एकूण १ हजार ८० ऐतिहासिक वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. त्या पाहताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एकप्रकारे आपण जवळून अनुभवत असल्यासारखं वाटतं अशा भावनिक प्रतिक्रिया आमदार पवार यांनी व्यक्त केल्या.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन धम्म दिक्षा घेतली ती भगवान गौतम बुद्धांची मूर्तीही या शांतीवन म्युझियम मध्ये ठेवण्यात आली आहे.विशेष म्हणजे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःपेन्सिलने रेखाटलेले गौतम बुद्धांचे आकर्षक चित्रही याठिकाणी आहे आणि बाबासाहेबांनी या चित्रात गौतम बुद्धांचे डोळे उघडे असल्याचे दाखवले आहे.ध्यानधारणा करण्यासाठी हे एक सुंदर ठिकाण असून हे सर्व पाहताना अतीव आनंद वाटत होता.
यावेळी मा.आ. प्रकाश गजभिये , मा.आ.सुनील भुसारा सलील देशमुख,ॲड. रविकांत वर्पे, पंकज बोराडे, विकास लवांडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!