आश्वी खुर्द येथील श्रीराम मंदिराचे दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम पुर्ण
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील ऐतिहासिक प्रभु श्रीराम, श्री दत्त आणि पुंजाआई माता संयुक्त मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी २० लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला.त्यामुळे नुकतेच या मंदिराचा बांधकामांचा दुसरा टप्पा मंदिरावर स्लॅब टाकुन पुर्ण झाले असुन सध्या ते काम प्रगतीपथावर आहे.
आश्वी खुर्द येथील ऐतिहासिक असे प्रभु श्रीराम, श्री दत्त आणि पुंजाआई माता मंदिर मोडकळीस आले होते. त्यामुळे गावातील जेष्ठ कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुणांनी एकत्र येऊन याबाबत मंत्री विखे पाटील, डॉ. सुजय विखे पा. व सौ.शालिनी विखे पाटील यांच्याकडे जिर्णाद्धारासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आग्रह धरला होता.विखे पाटील कुटुंबाचे आश्वी खुर्द गावावर विशेष प्रेम असल्याने मंत्री विखे पाटील यांनी मंदिर जिर्णोद्धार करण्यासाठी २० लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला.
सध्या काम अतिशय अमोघरित्या सुरु असुन कामाचा दुसरा टप्पा नुकताच संपला असुन ४२x ३३ जागेत तिन स्वंतत्र मंदिरे समोर सभामंडप सात सुंदर कोरीव बिंब व स्पॅल पुर्ण झाला असून स्लॅपवर चार सुंदर कळस नांदेड येथील शिल्पकार केंद्रे बंधु पुर्ण करणार आहे या संपूर्ण मंदिरास अंदाजे ४५ लाख रु.खर्च अपेक्षित असुन स्लॅब चे पुंजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी गावच्या सरपंच सौ.अलका गायकवाड उपसरपंच बाबा भवर विखे पाटील कारखान्याचे संचालक ॲड.अनिल भोसले दुध संस्थेचे अध्यक्ष मकरंद गुणे बाळासाहेब मांढरे नामदार राधाकृष्ण विखे पा.यांचे स्विय सहाय्यक बापुसाहेब गायकवाड सोसायटीचे मा.अध्यक्ष ज्ञानेश्वर खर्डे सेवानिवृत इंजि.सुरेश वाल्हेकर सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्यरत शिवाजी गायकवाड सुभाष गायकवाड गोरख गव्हाणे ह.भ.प.सुनिल पवार ह.भ.प. सचिन भडकवाड नाथ भक्त विठ्ठल मोरे मोहन बाबा गायकवाड दिलीप मांढरे संपत गायकवाड मा.सरपंच म्हाळु गायकवाड कैलास गायकवाड संतोष भडकवाड संजय गायकवाड शरद सोनवणे विकास गायकवाड संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागिय अभियंता काशिनाथ गुंजाळ शाखा अभियंता राहुल गुंजाळ स्थानिक सहाय्यक अभियंता गौरव राहाणे कृष्णा कहार मनोज कहार बाबा भोसले ग्रा.प.सदस्य सोपान सोनवणे संजय भोसले इंजि.श्रींकात कडलग रामराव शिंदे दिपक सोनवणे दगडु गायकवाड लक्ष्मण भोसले अण्णा शंडकर शाम रेणुकदास चांगदेव पांडे विजय पवार इंद्रभान गागरे ठेकेदार दादाभाऊ वदक महमंद पठाण गिताराम बर्डे जमाल शेख उत्तम भडकवाड भाऊसाहेब भडकवाड आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-आश्वीच्या अध्यात्मिक वैभवात भर घालणाऱ्या मंदिरांसाठी वर्गणी जमा करा- ॲड अनिल भोसले
गावचे ग्रामदैवत श्रीप्रभु राम श्री.दत्त पुंजाआई माता संयुक्त मंदिराचा जिर्णाध्दार होत असुन मंदिरास अंदाजे ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित असुन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी २० लाख रुपये निधी दिला आहे परंतु पुन्हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीसाठी शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे अजुन निधीची मागणी करण्यात येणार आहे तसेच गावच्या वर्गणीतुनही हे मंदिर पुर्णत्वास जाणार असुन ग्रामस्थ भाविकांनी आपली वर्गणी त्वरित जमा करावी असे आवाहन पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे संचालक ॲड अनिल भोसले यांनी केले.
